पुणे : कर्नाटक शासनाच्या अनेक बसेसला ठाकरे गटाच्या वतीने काळे फासण्यात आले असून आता फक्त काळे फासत आहोत, कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका, असा इशारा यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला. स्वारगेट येथील बसस्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटक शासनाच्या काही गाड्या उभ्या असताना शिवसैनिक तेथे धडकले आणि थेट गाडयांना काळे फासण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.
आज बेळगावपासून साधारण २५ किमी लांब असणाऱ्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या पाच ते सात ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे.
यामुळे टोलनाक्यावर वातावरण चिघळलं असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या गाडयांना काळे फसले आहे.
सकाळी घडलेल्या घटनेवर प्रत्येकाच राजकीय पक्षाकडून आक्रमक कर्नाटक सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडण्यात येत होती. त्यामुळे हा प्रश्न निश्चितच चिघळण्याची शक्यता होती. तीच गोष्ट पुण्यातील पडसादांनी अधोरेखित केली आहे.