-अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील अंजी (नृसिंह) येथील एका 15 वर्षीय पिडीतेवर शेतात अत्याचार करण्यात आला होता. त्याप्रकरणी आरोपीविरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेक ठाकरे असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटंजी तालुक्यातील अंजी (नृसिंह) येथील 15 वर्षीय पिडीता (दि. 8 डिसेंबर 2024) विवेक ठाकरे यांच्या शेतात कामानिमित्त गेली होती. तेथे आरोपी विवेक ठाकरे याने पिडीत मुलीचे कपडे काढून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे संबंधित पिडीतेला 2 महिन्यापासून मासिक पाळी आली नाही. म्हणून पिडीतेने मोठ्या आईला सांगितले. पिडीतेच्या कुटूंबियांनी चर्चा करून नंतर घाटंजी पोलिस ठाण्यात पिडीतेने जबानी रिपोर्ट दिला. त्यावरुन आरोपी विवेक ठाकरे विरुद्ध विविध कलमानुसार घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी विवेक ठाकरेविरुद्ध अपराध क्रंमाक 1053/2024 भारतीय न्याय संहिता कलम 65 (1) 69 सह कलम पोक्सो ॲक्ट नुसार घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विवेक ठाकरे यांस घाटंजी पोलिसांनी अटक केली असून घाटंजी पोलिस ठाण्याचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे पुढील तपास करीत आहे.