बापू मुळीक / सासवड : पुणे जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जिल्हा परिषद पुणे यांनी जिल्ह्यातील 551 कुपोषित बालकांची सॅम व मॅम ग्राम बाल विकास केंद्र अंतर्गत व्हीसीडीसी चा तिसरा टप्पा सुरू केलेला आहे. कुपोषित बालकांची 50 दिवसाची असून, कुपोषण निर्मूलन करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. सदर योजनेचा शुभारंभ हा पुरंदर मधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पिसर्वे येथील अंगणवाडी मध्ये जे .बी. गिरासे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते करण्यात आला.
पिसर्वे येथील अंगणवाडी केंद्रामध्ये झिरो एक, मध्यम कमी वजनाचे, एम ए एम चे बालक ग्राम बाल विकास केंद्रा मध्ये दाखल करण्यात आलेले आहे. व्हीसीडीसी केंद्रामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आहार संहिता व औषध संहिता तसेच ‘बाल ‘बाल’ कृष्णा ‘कोपरा बनवण्यात आलेला आहे .पुरंदर तालुक्यात एकूण 23 बालके ही कुपोषित असून एम ए एम श्रेणी त्यांना आज पासून अंगणवाडीमध्ये 50 दिवसांसाठी ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यांना या 50 दिवसांमध्ये केंद्रीय अधिकारी यांच्या सल्ल्याने व बाल विकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली औषधे व आहार दिला जाणार असून, त्यांचे वजन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
त्यांना कुपोषणातून बाहेर काढून सर्वसाधारण श्रेणी मध्ये आणण्यात येऊन तालुका कुपोषणातून बाहेर काढून सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्यात येऊन तालुका कुपोषण मुक्त करण्यात येणार आहे. ग्राम बाल विकास केंद्राचा शुभारंभ झाल्यानंतर जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक, महिला, ग्रामस्थ यांना व्हीसीडीसी चे महत्व व कुपोषण, निर्मूलन बाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्पाचे बाल विकास, प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांनी योजनेचा उद्देश व आवश्यकता याबाबत माहिती दिली. पिसर्वे गावचे सरपंच रवींद्र कोलते ,उपसरपंच महेश वाघमारे यांनी शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेचा कौतुक करून गावाचा पूर्ण सहकार्य देण्याबाबत आश्वासित केले.