मुंबई : इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही आढावा घेत पाहणी केली आहे. बाबासाहेब यांचा आठवणी जपण्याचा काम केलं जाईल. राजगृहवरील ऐतिहासिक ठेवा सुद्धा जपला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिनाच्या निमिताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
‘माझ्यासारख्या सर्व सामान्य कुटुंबातील नागरिक आज मुख्यमंत्री झाला हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडलं. दलित समाजात रुजलेली न्यूनगंडाची भावना बाबासाहेबांननी काढून टाकली. दलित बांधवांमध्ये जो आत्मविशास निर्माण झाला, त्याचं श्रेय डॉ. आंबडेकरांना जातं.’ असे मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले.
अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी रांग लागली आहे. त्यांना सर्व सुविधा देण्याचा काम राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. अनुयायांनी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंबई महापालिकेकडे विशेष धन्यवाद व्यक्त करतो, असे म्हणताना त्यांनी मुंबई महापालिकेचे आभार मानले.