राहुल कुमार अवचट / यवत : प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ दौंड तालुका व ग्रामीण रुग्णालय यवत यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिराचे आज (दि.९) यवत ग्रामीण रुग्णालय येथे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार हा आपल्या दैनंदिन जीवनात अनेक शारीरिक व मानसिक त्रास सहन करीत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने समाजातील चाललेल्या चांगल्या वाईट घटनांना वाचा फोडण्याचे कार्य करत असतो.
पत्रकारांची आरोग्याची तपासणी व्हावी या उद्देशाने प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ दौंड तालुका यांच्या वतीने तालुक्यातील पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे असून अपाय होण्याअगोदर उपाय करावा त्यामुळे किमान वर्षातून एकदा तरी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. तसेच आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रत्येक दिवशी किमान पाच किलोमीटर अंतर चालावे, असे आवाहन यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर पत्की यांनी केले. यावेळी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील जगताप यांनी पत्रकारांनी धावपळीच्या युगामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
पत्रकारांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन
दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघ व ग्रामीण रुग्णालय यवत यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगताप बोलत होते. पत्रकार नेहमी अन्यायाच्या विरोधात लढत समाजाला न्याय व दिशा देत असतात पत्रकारांच्या हितासाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच यवत रुग्णालयात मोफत डायलिसिस केंद्र लवकरच सुरू होणार असून त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे देखील आवाहन डॉ. पत्की यांनी केले. यावेळी बोलताना पत्रकार संघाचे दौंडचे अध्यक्ष संदीप सोनवणे म्हणाले की, दौंड तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य करत असल्यामुळे विविध उपक्रम राबविण्यात येत असून सर्वांच्या सहकार्याने असे उपक्रम राबविण्यात येत असून यापुढे देखील पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पत्की व हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी यांनी या शिबिरासाठी बहुमूल्य सहकार्य केल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळभोर, जिल्हा सचिव संदीप बोडखे, जिल्हा पदाधिकारी विजय काळभोर, संदीप नवले, बाळासाहेब मुळीक, दौंड तालुका सचिव राहुलकुमार अवचट, तालुका उपाध्यक्ष संदीप भालेराव, विलास कांबळे, अनिल गायकवाड, विकास शेंडगे, अविनाश लोंढे, गौरव दिवेकर, मिलिंद शेंडगे, नेताजी खराडे, संदीप चव्हाण, संतोष जगताप, विठ्ठल थोरात, आदित्य बारवकर, धनाजी ताकवणे, राहुल बिचकुले, शशिकांत रासकर यांसह प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ दौंड तालुक्याचे अनेक सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.