मुंबई : पुढच्या वर्षात किती आणि कधी सार्वजनिक सुट्ट्या मिळणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. अगदी शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सरकारी कर्मचारी, शिक्षक, बँक कर्मचारी यांचेही डोळे सुट्ट्यांच्या यादीकडे लागून राहिले असतात. २०२४ संपण्यास काही दिवस शिल्लक असतानाच राज्य सरकारने पुढील वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढच्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत.
राज्य सरकारने पुढील वर्ष म्हणजेच २०२५ साठीच्या शासकीय सुट्टयांची घोषणा केली आहे. या वर्षात २४ शासकीय सुट्टया असणार आहेत. ३० मार्च रोजी गुढीपाडवा, दसरा २ ऑक्टोबर, तर २१ व २२ ऑक्टोबर रोजी दिवाळीनिमित्त सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील वर्षी प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) गुढीपाडवा (३० मार्च), मोहरम (६ जुलै) या तीन सुट्टया रविवारी येत आहेत.
होळी (दुसरा दिवस) शुक्रवारी १४ मार्च रोजी येत असल्याने १४ ते १६ मार्च अशा सलग तीन सुट्टया शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. १४ एप्रिलला सोमवारी तसेच गुड फ्रायडेनिमित्तची सुट्टी १८ एप्रिल रोजी आहे. पुढील वर्षी १५ ऑगस्ट शुक्रवारी स्वातंत्र्य दिनासोबतच पारशी नववर्ष दिनही येत असून १५ ते १७ ऑगस्ट अशा सलग तीन दिवसांची सुट्टी नोकरदारांना लाभणार आहे. ईद-ए-मिलाद शुक्रवारी ५ सप्टेंबरला येत असल्याने ५ ते ७ सप्टेंबर या काळात सलग तीन सुट्ट्या मिळतील. महावीर जयंतीची सुट्टी १० एप्रिल गुरुवारी आहे. महाराष्ट्र दिन १ मे निमित्तची सुट्टी गुरुवारी आहे. बुद्ध पौर्णिमेची सुट्टी १२ मे सोमवारी येत आहे.
वाचा सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी
- प्रजासत्ताक दिन : २६ जानेवारी, २०२५, रविवार
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती : १९ फेब्रुवारी, २०२५, बुधवार
- महाशिवरात्री : २६ फेब्रुवारी, २०२५, बुधवार
- होळी (दुसरा दिवस) : १४ मार्च, २०२५, शुक्रवार
- गुढीपाडवा : ३० मार्च, २०२५, रविवार
- रमजान ईद (ईद-उल-फितर) : ३१ मार्च, २०२५ : सोमवार
- रामनवमी : ०६ एप्रिल, २०२५ : रविवार
- महावीर जन्म कल्याणक : १० एप्रिल, २०२५, गुरुवार
- डॉ. बाबासाहेव अआंबेडकर जयंती : १४ एप्रिल, २०२५, सोमवार
- गुड फ्रायडे : १८ एप्रिल, २०२५, शुक्रवार
- महाराष्ट्र दिन : ०१ मे, २०२५, गुरुवार
- बुध्द पौर्णिमा : १२ मे, २०२५, सोमवार
- बकरी ईद (ईद-उल-शुआ) : ०७ जून, २०२५, शनिवार
- मोहरम : ०६ जुलै, २०२५, रविवार
- स्वातंत्र्य दिन : १५ ऑगस्ट, २०२५, शुक्रवार
- पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) : १५ ऑगस्ट, २०२५, शुक्रवार
- गणेश चतुर्थी : २७ ऑगस्ट, २०२५, बुधवार
- ईद-ए-मिलाद : ०५ सप्टेंबर,२०२५, शुक्रवार
- महात्मा गांधी जयंती : ०२ ऑक्टोवर, २०२५, गुरुवार
- दसरा : ०२ ऑक्टोबर, २०२५, गुरुवार
- दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) : २१ ऑक्टोबर, २०२५, मंगळवार
- दिवाळी (बलिप्रतिपदा) : २२ ऑक्टोबर, २०२५, बुधवार
- गुरुनानक जयंती : ०५ नोव्हेंबर, २०२५, बुधवार
- ख्रिसमस : २५ डिसेंबर, २०२५, गुरुवार
केवळ बँकासाठी
खालील सुट्टी बँकांसाठी मर्यादित आहे. सदर सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही.
१ एप्रिल, २०२५, मंगळवार
प्रमुख सण व सुट्ट्या
- शिवाजी महाराज जयंती : १९ फेब्रुवारी (बुधवार)
- होळी (दुसरा दिवस) : १४ मार्च (शुक्रवार)
- गुढीपाडवा : ३० मार्च (रविवार)
- रमजान ईद : ३१ मार्च (सोमवार)
- बुद्ध पौर्णिमा : १२ मे (सोमवार)
- महावीर जयंती : १० एप्रिल (गुरुवार)
- गणेश चतुर्थी : २७ ऑगस्ट (बुधवार)
- दिवाळी (लक्ष्मीपूजन) : २१ ऑक्टोबर