मुंबई: बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून, ७९ वर्षीय सुभाष घई यांना शनिवारी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच अशक्तपणा आणि चक्कर येत असल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे.
सुभाष घई यांच्यावर न्यूरोलॉजिस्ट डॉ. विजय चौधरी, हृदयरोग विशेषतज्ज्ञ डॉ. नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकरांसह इतर टीम यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. श्वासासंबंधी तक्रारी, अशक्तपणा, सतत चक्कर येणे, स्मृती कमी होत जाणे आणि बोलताना अडचण येणे अशा अनेक समस्या त्यांना जाणवू लागल्या. आता ते उपचारांना प्रतिसादही देत आहेत. दोन दिवसांनी त्यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याचीही शक्यता आहे.