-गोरख कामठे
फुरसुंगी : फुरसुंगी गावचे माजी प्रभारी सरपंच स्व. विजय (भाऊ) रामचंद्र हरपळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त फुरसुंगी गाव येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 145 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या समारंभाचे उद्घाटन मा.डॉ. अबनावे तसेच मा. पंचायत समिती सदस्य दिनकर बाप्पू हरपळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य राजीव भाडळे, राजाभाऊ सुर्यवंशी, राजूशेठ चंद, अमृत हरपळे, विशाल हरपळे, प्रविण काळभोर, सुहास खुटवड, अमोल हरपळे, गोरख कामठे, बाळासाहेब हरपळे, उदय हरपळे, निलेश पवार, किरण हरपळे, बाजीराव सायकर, अमोल हरपळे, विनायक हरपळे, सागर हरपळे, संतोष सरोदे, किरण पवार,तसेच पंचक्रोशीतील नामवंत मित्र परीवार व फुरसुंगी गावातील ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला होता.