उरुळी कांचन, (पुणे) : येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय!’च्या घोषात शिंदवणे (ता. हवेली) येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव जल्लोषात व चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला.
शिंदवणे येथील शितोळे मळ्यातील खंडोबा मंदिर जीर्णोद्धार केल्यापासून चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात येतो. श्री खंडोबाच्या उत्सवानिमित्त मंदिरास आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिर फुलांनी सजविले होते. यावेळी शनिवारी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी तसेच नैवेद्य ठेवण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले होते.
शेवटच्या दिवशी मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट केली होती. जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित व महाप्रसादात वांग्याचे भरीत व भाकरीचे आयोजन केले होते. खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी व कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दरम्यान, चंपाषष्ठीच्या दिवशी शिरूर – हवेलीचे विद्यामान आमदार माऊली आबा कटके यांच्या पत्नी कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. यावेळी उरुळी कांचनचे सरपंच अमित कांचन, यशवंत सहकारी कारखान्याचे सचांलक संतोष कांचन, भाजप नेते सुदर्शन चौधरी, अजिंक्य कांचन, कोरेगाव मूळचे माजी सरपंच विठ्ठल शितोळे, शिंदवणे गावाचे उपसरपंच सागर खेडेकर, पै शिवाजी महाडिक, सचिन मचाले, सागर आबा कांचन, विविध गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच, सदस्य व नागरिक व देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.