पुणे : पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन पोलीसांना आल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवला असल्याचा पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षात अज्ञात व्यक्तीकडून आज सकाळी 9 वाजता फोन आला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ कामाला लागली. यासंदर्भात फोन करणा-या व्यक्तीला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अज्ञात व्यक्तींनी दारुच्या नशेत फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीसांनी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
फोन करणारी व्यक्ती ही अंदाजे 40 वर्षाची असून पिंपरी – चिंचवड भागातील रावेत येथील राहिवाशी आहे. या व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदj व्यक्तीने नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती उघडकीस आली आहे. पिंपरी – चिंचवड पोलिसांकडून त्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.