सोलापूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर मी राजीनामा देणार आहे. माझी पोटनिवडणूक घ्यावी अशी माझी विनंती आहे, असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर म्हणाले आहेत. मारकडवाडी येथे आज शरद पवार भेट देण्यासाठी आले आहेत. ईव्हीएमवर संशय घेत बॅलेट पेपरवर मतदान घ्या, या मागणीसीठी माळशिरसमधील गाव पुढे सरसावले होते. त्यासंदर्भात शरद पवार यांनी मारकडवाडीला भेट दिली. यावेळी उत्तम जानकर यांनी लोकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राजीमाना द्यायला तयार असल्याचं म्हटलं आहे.
मी खरोखरचा राजीनामा देतोय : उत्तम जानकर
मारकडवाडी ग्रामस्थांनी लोकशाहीतील हुकुमशाहीच्या थोबाडीत मारली आहे. फक्त मारकडवाडीच नाही तर माळशिरसच्या मतमोजणी विरोधात संपूर्ण तालुक्यात आक्रोश आहे. बॅलेट पेपरवरील मतमोजणीसाठी सर्व उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले होते. पण इतर उमेदवार आले नाहीत. बॅलेटवरील मतमोजणी होऊ नये, यासाठी सीआरपीएफच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मी खरोखरचा राजीनामा देणार आहे. पण हे कोणालाच मान्य नाही, असे उत्तम जानकर यावेळी म्हणाले.
उत्तम जानकर यांनी याबाबत मारकडवाडी येथे असणाऱ्या लोकांना विचारले. मी खरोखरचा राजीनामा देतोय. पण हे कोणालाच मान्य नाही. जानकर यांनी लोकांना विचारले हातवर करुन सांगा , हे तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही ॲफीडेव्हीट करणार आहेत का? तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींचा ठराव करुन देणार आहे. या निवडणुकीच्या विरोधात आहे, अशी माहिती मिळाली आहे.
लोकशाही शरद पवारच वाचवू शकतात
लोकशाही वाचवायची असेल तर, ती केवळ शरद पवारच वाचवू शकतात. सगळ्यांनी हात वर करून सांगा मी राजीनामा देऊ का? राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर मी राजीनामा देणार आहे. राहुल गांधी यांचे लोक मारकडवाडीत येऊन गेले. तसेच अनेक निवृत्त जज येथे येणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते येणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत माळशिरसच्या बाजारात मोदींना आणलं होतं, तरीही भाजपच्या उमेदवाराला ६४ हजार मतदान झाले होते. आणि विधानसभेला १ लाख ८ हजार कसे झाले, असा प्रश्न उत्तम जानकर यांनी उपस्थित केला आहे.