मध्य प्रदेश : साउथ स्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जास्त पैसे मोजून चाहते ‘पुष्पा 2’ पाहण्यासाठी जात आहेत. हैदराबादमध्ये पार पडलेला ‘पुष्पा 2’ च्या स्क्रीनिंग दरम्यान अभिनेता अल्लू अर्जुनला पाहायला झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आता थिएटरमध्ये चित्रपटादरम्यान मारामारी झाल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सिनेमागृहात ‘पुष्पा 2′ चित्रपटादरम्यान मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. कांतिशिवा मल्टीप्लेक्समध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान दोन गटात राडा झाला आहे. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला चढवला. दोन्ही गटांमध्ये बराच वेळ हाणामारी झाली. यावेळी सभागृहात उपस्थित इतर प्रेक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मारामारी थांबवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने वाद थांबला आणि त्यानंतर दोन्ही गटातील लोक चित्रपट न पाहताच निघून गेले.
वाद सुरू असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.’पुष्पा 2: द रुल’ चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. यात तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांचा समावेश आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली असल्याचे बोलले जात आहे.