नातं नवीन असताना संवाद जास्त होत असतो. पण, जसंजसं नातं जुनं होतं त्यानंतर संवादही कमी होत जातो. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही आणि तुमचा जोडीदार किंवा प्रियकर एकमेकांपासून दूर जात आहात, तर तुम्ही विलंब न करता तुमच्या जोडीदारासोबत तेच नाते पुन्हा प्रस्थापित करण्याचा आग्रह धरला पाहिजे.
काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास बिघडलेले नाते पुन्हा नवं होऊ शकते. जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा सल्ला दिला जातो. जर तुमच्या जोडीदारामध्ये काही अंतर असेल तर तुम्हाला दोघांनी एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायला हवा. तुमच्या नात्यातील कटुता आणि अंतर कमी करण्यासाठी तुम्हाला स्वतःचे प्रयत्न करावे लागतील. यासाठी समोरच्याने पुढाकार घेण्याची वाट पाहू नका. तुम्ही स्वत: त्यासाठी प्रयत्न करा.
तसेच जेव्हा नात्यात चढ-उतार येतात तेव्हा एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संबंध पुन्हा मजबूत करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. आपल्या जोडीदारापासून दूर गेल्यावर आयुष्यात अनेकदा अशी वळणे येतात, अनेक वेळा एकत्र राहूनही नात्यातील अंतर इतके वाढते की ते एकमेकांशी बोलतही नाहीत. त्यात संकोच आणि कधी कधी अहंकार तुमच्या नात्याला कमकुवत करतो. कम्युनिकेशन गॅपमुळे कोणत्याही नात्याचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी नेहमी बोलत राहा.