नवी दिल्ली : सध्या टेक मार्केटमध्ये अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Itel ने आपला शक्तिशाली Alpha Pro स्मार्टवॉच लाँच केला आहे. या स्मार्टवॉचमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले असून, पैसा वसूल असा स्मार्टवॉच असणार आहे.
Itel चा शक्तिशाली Alpha Pro स्मार्टवॉच आपल्या आकर्षक डिझाईन आणि शक्तिशाली स्पोर्ट्स मोडसह मिळत आहे. या स्मार्टवॉचचे स्वरूप आणि फीचर्स प्रीमियम डिव्हाईस सारखे आहे. यामध्ये हेल्थ-ट्रॅकिंग फीचर्स मिळत आहे. जे फिटनेस प्रेमींसाठी एक बेस्ट पर्याय देत आहे. Itel Alpha Pro हा स्मार्टवॉच अत्यंत आकर्षक आणि आधुनिक असा आहे. यात स्लिम आणि स्टायलिश मेटल बॉडी देण्यात आली असून, जी प्रीमियम फील देते. त्याचा एचडी डिस्प्ले मोठा आणि स्टायलिश असा आहे.
Itel Alpha Pro मध्ये विविध स्पोर्ट्स मोड असून, ज्यामुळे फिटनेस फीचर्सचा समावेश आहे. यात धावणे, सायकल चालवणे, पोहणे, चालणे आणि योगासने यांसारख्या पद्धतींचा समावेश आहे, जे तुमच्या प्रत्येक मूव्हमेंटचे अचूक निरीक्षण करू शकतील. तुम्ही जीममध्ये व्यायाम करत असाल तर हे स्मार्टवॉच प्रत्येक मूव्हमेंटसाठी योग्य आहे. तसेच यामध्ये दमदार बॅटरीही देण्यात आली आहे.