पुणे प्राईम न्यूज डेस्क: नुकताच मुहूर्त झाल्यानंतर ‘सुशीला सुजीत’ च्या चित्रीकरणाला धडाक्यात सुरुवात झालेली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक हे पहिल्यांदाच एकत्र येत असून, चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या नावापासून सुरू झालेली उत्कंठा या चित्रपटात सुशीला कोण आणि सुजीत कोण? या बहुचर्चित प्रश्नापर्यंत ताणली गेली होती.
मात्र, या दोन भूमिकांमध्ये कोण असणार, याचे उत्तर देताना निर्मात्यांनी सुशीलाच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी, तर सुजितच्या भूमिकेत स्वप्नील जोशी असेल असे नुकतेच जाहीर केले आहे. आता चित्रपटाशी संबंधित आणखीही काही नावीन्यपूर्ण गोष्टींच्या घोषणा व्हायच्या आहेत. प्रसाद ओक हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, तर संजय मेमाणे हे सिनेमॅटोग्राफर आहेत. पटकथा-संवाद अजय कांबळे यांचे आहेत. चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.