पुणे : अझीम प्रेमजी विद्यापीठाने त्यांच्या बंगळुरू क्षेत्रात पदव्युत्तर पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एज्युकेशन-अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनउ (बालपणीचे शिक्षण), इन्क्ल्युझिव्ह एज्युकेशन (सर्वसमावेशक शिक्षण), टिचिंग चिल्ड्रेन विथ लर्निंग डिसअॅबिलिटीज (शिकण्यास सक्षम नसलेल्या मुलांना शिकवणे) आदींचा समावेश आहे. अर्ज करण्यास अखेरचा दिवस १२ जानेवारी आहे.
संचालक अंकुर मदान म्हणाले, एक वर्षाच्या अर्धवेळ अभ्यासक्रमात लेखी आणि सराव पद्धतीचे संतुलित मिश्रण आहे. ऑनलाईन आणि कॅम्पसमध्ये परस्परसंवादासह एकत्रित अभ्यासक्रमाचा यामध्ये समावेश आहे. कार्यरत शिक्षक आणि समकक्षांच्या क्षमता विकसित करण्यात मदत करण्यासाठी विकसित अभ्यासक्रमाची गरज पूर्ण करणे हा यामागील उद्देश आहे.