लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील लोकनेते दिवंगत विलास तुपे यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सामाजिक बांधिलकी जपत मोफत आरोग्य शिबिराचे शुक्रवारी (ता.6) आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचा 300 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. तर या शिबिरात 67 जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला आहे. या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील धुमाळ परिसरात या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाट्न कुंजीरवाडीच्या माजी उपसरपंच मीनाताई तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मणिभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, डॉ. शिवदीप उंद्रे, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर, माजी सदस्य हिरामण काकडे, उरुळी कांचनचे सरपंच अमित कांचन, हभप आनंद महाराज तांबे, माजी सरपंच सचिन तुपे, सुनीता धुमाळ, दिपक ताम्हाणे, सुरेश कुंजीर, भाऊसाहेब तुपे, कैलास तुपे, गोरख तुपे, अजय कुंजीर व ग्रामस्था मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार, डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्टार हॉस्पिटलचे डॉ. विजय पाटिल व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या तीनशेहून अधिक नागरिकांना आरोग्यसेवा दिली. नागरिकांची मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटपाचे काम दिव्यांशी आय केअर क्लिनिकच्यावतीने करण्यात आले होते. या शिबिरात दीडशे नागरिकांचे डोळे तपासून १०५ चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. यासाठी क्लिनिक चे डॉ. कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांचे बहुमुल्य योगदान मिळाले. तर या शिबिरात एकूण ६७ नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी विलास बापु तुपे मित्र परिवाराच्या वतीने रक्तदात्यांना आकर्षक बॅगचे वाटप करण्यात आले. तर ब्लड बँकेच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देण्यात आले.
दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी विलास बापूंच्या विविध आठवणींना उजाळा देऊन, सर्वसामान्य जनतेला मध्यवर्ती ठेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी बापूंनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव केला. तसेच, दिवंगत विलास (बापु) तुपे मित्र परिवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे सुद्धा कौतुक केले. या शिबिराचे आयोजन दिवंगत विलास बापु तुपे मित्र परिवाराचे प्रमुख आधारस्तंभ नयन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास धुमाळ सर यांनी सदर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ धुमाळ यांनी केले तर स्वप्निल कुंजीर यांनी आभार मानले.