पुणे : महापालिकेने पालिका हद्दीतील थकीत मिळकतकर वसुलीची मोहीम सुरू केली असून, थकीत मिळकतदारांच्या घरासमोर बँड वाजविल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत पाच दिवसांत १५ कोटी रुपये थकबाकी जमा झाली. तर, शुक्रवारी पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाने सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या एरंडवणे येथील इमारतीवर जप्तीची कारवाई केली आहे. या इमारतीची पुणे पालिकेकडे ४७ कोटींची थकबाकी होती.
या आर्थिक वर्षात आजपर्यंत एकूण १८०० कोटी रुपये इतका मिळकतकर जमा झाला आहे. यंदा २७०० कोटींचे उद्दिष्ट ठेवले असून, हे उद्दिष्ट गाठण्याची यंदा शक्यता कमी आहे. तसेच यात मिळकतकर थकीत असलेल्या मिळकतधारकांच्या मिळकती जमा केल्या जाणार आहेत.