सोलापूर : सोलापुर जिल्ह्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. सोलापुरात युवा शिवसेनेचे संपर्क प्रमुखांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्हा युवा शिवसेनेचे संपर्क प्रमुख सागर पाटील असं हल्ला झालेल्या नेत्याचे नाव आहे. संपर्क प्रमुख हे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांचे पुतणे आहेत. ही घटना आज शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास माजी आमदार शहाजी पाटील यांच्या ऑफीससमोर घडली आहे. या घटनेने सोलापुरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्हा युवा शिवसेनेचे संपर्क प्रमुख सागर पाटील यांच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे. सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांच्या ऑफीससमोर उभ्या केलेल्या कारवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सागर पाटील हे माजी आमदार शहाजी पाटील यांचे पुतणे आहेत.
अज्ञात व्यक्तीने कारवर हल्ला केला, त्यावेळी कारमध्ये कोणी नव्हतं. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सागर पाटील यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सागर यांच्या कारवर नेमका हल्ला कोणी आणि का केला याची माहिती समोर आलेली नाही. तसेच या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे.