नवी दिल्ली : सध्या अनेक बँकांकडून ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड आणले जात आहेत. त्यानुसार, ग्राहकांकडून याचा वापरही वाढला आहे. पण, हेच क्रेडिट कार्ड वापरताना काही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते. पण, नेमकी काय काळजी घ्यावी? याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
क्रेडिट कार्डद्वारे फ्रॉड होण्याचे मुख्य कारण म्हणजे क्रेडिट कार्ड नंबर, कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू (CVV) आणि एक्सपायरी डेटची चोरी. जर कोणाकडे तुमच्या कार्डची ही तीन माहिती असेल तर तो तुमची फसवणूक करू शकतो. यासाठी, स्कॅमर कोणत्याही आंतरराष्ट्रीय गेटवेचा वापर करून तुमच्या क्रेडिट कार्डने ऑनलाईन शॉपिंग करू शकतात. इंटरनॅशनल गेटवे हे ऑनलाईन पेमेंटचे साधन आहे, ज्यामध्ये पेमेंटसाठी ओटीपी आवश्यकता भासत नाही. यासाठी फक्त क्रेडिट कार्डचे तपशील पुरेसे आहेत. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
जेव्हा तुम्ही शॉपिंग मॉल, पेट्रोल पंप यांसारख्या ठिकाणी तुमचे क्रेडिट कार्ड स्वाईप करण्यासाठी देता, तेव्हा कार्डचे डिटेल्स चोरीचा धोका वाढतो. हॅकर्स हे डिटेल्स भारताबाहेर विकू शकतात. त्याने तुमची फसवणूक होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला तुमचं कार्ड अगदी व्यवस्थितपणे कंट्रोल करता येणं गरजेचं आहे. त्याने पुढील धोका टाळता येऊ शकतो.
या गोष्टींकडेही द्या लक्ष…
– तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डचा सिक्रेट पिन क्रमांक मिळाला की, तो लगेच लक्षात ठेवा.
– यानंतर, तुमचा सिक्रेट पिन क्रमांक असलेले दस्तऐवज नष्ट करा.
– यापूर्वी क्रेडिट कार्डच्या मागील बाजूस फक्त चुंबकीय पट्टी होती. आता चिप वापरली जाते.
– चिप कार्ड अधिक सुरक्षित आहेत. त्यामुळे तुमच्या कार्डमध्ये चिप नसेल तर ते तुमच्या बँकेतून अपग्रेड करून घ्या.
– दर 15 दिवसांनी एकदा तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट किंवा ट्रान्झॅक्शन डिटेल्स तपासा. व्यवहारात काही तफावत आढळल्यास तत्काळ बँकेकडे तक्रार करा.