आपल्यापैकी अनेकांनी युरिक ॲसिड हे नाव कधीना कधीतरी ऐकले असलेच. हे युरिक ॲसिड वाढल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याने किडनी स्टोन अर्थात मुतखडाही होऊ शकतो. त्यामुळे हे ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
युरिक ॲसिड हा एक खराब घटक आहे. हे त्या खाद्यपदार्थांपासून बनवले जाते, ज्यामध्ये जास्त प्रमाणात प्युरीन असते. शरीराच्या पेशींमध्ये प्युरिन्स देखील असतात. सामान्यत: पुरुषांमध्ये युरिक ॲसिडची पातळी 2.5-7.0 मिलीग्राम प्रति डेसीलीटर (mg/dL) असते आणि महिलांमध्ये 1.5-6.0 मिलीग्राम प्रति डेसीलिटर (mg/dL) असते. यापेक्षा जास्त असल्यास, ते उच्च मानले जाते, ज्यामुळे अनेक गंभीर आजार बळावू शकतात.
युरिक ॲसिडवर सफरचंद प्रभावी मानले जाते. 100 ग्रॅम सफरचंदात सुमारे 4 ग्रॅम फायबर असते, जे दररोजच्या आहाराच्या 16% असते. फायबर रक्तातील युरिक ॲसिड कमी करते. याशिवाय, सफरचंदात मॅलिक ॲसिड देखील असते, ज्यामुळे शरीरातील युरिक ॲसिडचा प्रभाव कमी होतो. युरिक ॲसिड कमी करण्यासाठी चेरी खूप फायदेशीर आहे. चेरीमध्ये अँथोसायनिन नावाचा नैसर्गिक दाहक-विरोधी घटक असतो, जो युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित करतो.
युरिक ॲसिड वाढल्यास काय होऊ शकतं?
– सांधेदुखी
– लघवी करताना जळजळ
– किडनी स्टोन
– मूत्रपिंड निकामी
– हृदयाशी संबंधित समस्या.
– मधुमेहाचा धोका वाढू शकतो.