पिंपरी: मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या १० वाहनांचा ई-लिलाव जाहीर करण्यात येणार आहे. २६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे हा लिलाव होणार आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी उपलब्ध असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.
ई-लिलावात सहभागी होण्यासाठी १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत http://www.eauction.gov.in/ या ‘संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करावी. लिलावाच्या अटी व नियम ९ डिसेंबर रोजी पासून कार्यालयीन कामकाजाच्यादिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथील नोटीस बोर्डावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहिल. तसेच सदस्ची वाहने पाहण्याकरिता ९ ते २४ डिसेंबर या कालावधीत परिवहन अधिकारी कार्यालय, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड येथे उपलब्ध असणार आहेत. ‘वाहने जशी आहे तशी’ या तत्वावर जाहिर ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.
वाहनांची यादी http://www. eauction.gov.in/ या संकेतस्थळावर, प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी- चिंचवड, जिल्हाधिकारी कार्यालय, आदी सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. लिलाव रद्द करण्याचे अधिकार परिवहन अधिकारी यांनी स्वतःकडे राखून ठेवले असल्याची माहिती देण्यात आली.