शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालूक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बिडी पिण्याचे व्यसन असलेला एक ज्येष्ठ नागरिक बिडी पीत असताना अचानकपणे त्यांच्या लुंगीला आग लागली. या आगीत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. छोटूभाई फकीर मोहम्मद शेख (वय- ८५ वर्षे, रा. डंबेनाला, ता. शिरुर, जि. पुणे) असं मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.
याबाबत हमीद छोटूभाई शेख यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ही घटना शिरूर शहरातील डंबेनाला परिसरात ४ डिसेंबर रोजी घडली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर येथील डंबेनाला परिसरात छोटूभाई शेख राहण्यास आहेत. त्यांना बिडी पिण्याचे व्यसन असल्याने ते ४ डिसेंबर रोजी त्यांच्या घराच्या बाहेर खुर्चीवर बसून बिडी पेत बसले होते. त्यावेळी त्यांच्या लुंगीला अचानकपणे आग लागली. यावेळी त्यांच्या घरातील व्यक्तींनी पाण्याने आग विझवत त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, ५ डिसेंबर रोजी छोटूभाई शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत हमीद छोटूभाई शेख यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिपक राऊत हे करत आहे.