शिक्रापूर : विजेचा शॉक बसल्याने एका युवकाचा मृत्यू झाला.ही घटना हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथे घडली. किरण दिलीप धुमाळ (वय ३८ रा. पिंपळे खालसा ता. शिरुर जि. पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत भगवान प्रभू गावडे (वय ४३ रा. गावडे वस्ती हिवरे कुंभार ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, विजेची तार तुटल्याने वायरमन राजेंद्र वैद्य यांनी मदतीसाठी गावातील भगवान गावडे व किरण धुमाळ यांना बोलावून घेतले होते. दरम्यान, किरण हे विजेच्या खांबावर चढले असताना त्याला विजेचा धक्का लागून ते जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी किरण यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.