नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या बेंचखाली 500 रुपयांच्या नोटांचं बंडल सापडल्याचे समोर आले होते. काल सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यानंतर तपासणीदरम्यान नोटा सापडल्याची माहिती समोर आली आहे. आज सभापतींनी याबाबत सभागृहाला अधिकृत माहिती दिली.
राज्यसभेच्या 222 क्रमांकाच्या बेंचखाली 500 रुपयांच्या नोटांचं बंडल सापडलं आहे. कॉंग्रेस खासदार अभिषेक मनी सिंघवी या बेंचवर बसतात. त्यांच्यावर सभापती धनकड यांनी गंभीर आरोप केला आहे. धनकड यांच्या या दाव्याचा कॉंग्रेस खासदारांनी सभागृहात निषेध केला आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी चौकशीपूर्व नावे घेऊ नये, असा टोला लगावला आहे.
दरम्यान, या नोटा ख-या आहेत की खोट्या आहेत, याबाबत तपास सुरु आहे. संसद भवनाच्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम देखील सुरु आहे. या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत देशभरात राजकीय वातावरण तापलेले राहिल, असे दिसत आहे.
मनू सिंघवी यांनी आरोप फेटाळले….
मी राज्यसभेत जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये होते. तसेच मी गुरुवारी राज्यसभेत 12.57 वाजता सभागृहात पोहोचलो होतो. त्यानंतर फक्त तीन मिनिटांनी सभागृह बरखास्त करण्यात आली. त्यानंतर मी अयोद्धेचे खासदार अवधेश प्रसाद यांच्यासमवेत आणि संसदेतून बाहेर पडलो, असं स्पष्टीकरण अभिषेक मनू सिंघवी यांनी दिले.
#WATCH | Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar says, “I here by inform the members that during the routine anti-sabotage check of the chamber after the adjournment of the House yesterday. Apparently, a wad of currency notes was recovered by the security officials from seat number… pic.twitter.com/42GMz5CbL7
— ANI (@ANI) December 6, 2024