नवी दिल्ली : सध्या Poco कंपनीकडून डिसेंबर महिन्यात दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. कंपनीने डिव्हाईसचे नाव आणि लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी 17 डिसेंबर रोजी Poco M7 Pro 5G आणि Poco C75 5G लाँच करणार आहे.
Poco ने Poco M7 Pro 5G मध्ये अनेक बेस्ट फीचर्स दिले आहेत. यामध्ये AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून, जो 2100 nits पर्यंत असू शकतो. Poco कंपनीकडून 17 तारखेला काहीतरी मोठे घडणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावरच्या फोटोमध्ये फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरे दिसत आहे. Poco C75 5G हा सोनी सेन्सरसह भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असेल.
स्मार्टफोनमध्ये 6.88-इंचाचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. त्यात नवीन Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसर असू शकतो. तर डिव्हाईसमध्ये 5160mAh बॅटरी आणि 18W चार्जिंग सपोर्ट असू शकतो. स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz असेल. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 2100 nits असू शकते आणि ती HDR 10+ ला सपोर्टची शक्यता आहे.