पुणे : तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहात? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि निवासी वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला हिंगोली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि निवासी वैद्यकीय अधिकारी.
– नोकरीचे ठिकाण : हिंगोली.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 11 डिसेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : डीन कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://gmchingoli.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.