बापू मुळीक / सासवड : नारायणपूर (ता. पुरंदर) येथे परमपूज्य सद्गुरु नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने 13 डिसेंबर रोजी प्रथम दिवस यज्ञकुंड वर्धापन दिन म्हणून आजोळ ज्योत हिवरे येथे स्वागत दुपारी होणार आहे. सायंकाळी सहा वाजता कोटी शिव दत्त नाम यज्ञ अखंड प्रज्वलित अग्री यज्ञ कुंड 24 वा वर्धापन दिन होणार आहे. रात्री साडेआठ वाजता श्री दत्त मंदिरात आरती होणार आहे.
तसेच 14 डिसेंबर रोजी दत्त जन्म सोहळा दुपारी दोन नंतर येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता श्रीदत्त जन्म सोहळा झाल्यानंतर सुटवडा व महाप्रसाद होणार आहे. 15 डिसेंबर रोजी तृतीय दिवस पहाटे चार ते सहा या वेळेत रुद्राअभिषेक, सकाळी नऊ वाजता श्री दत्त महाराजांच्या पालखीतून ग्राम प्रदक्षिणा होणार आहे. दुपारी दीड वाजता प्रवचन, आरती व महाप्रसाद होणार आहे, अशी माहिती परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांनी दिली.
दिलीप यादव, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, प्रांत वर्षा लांडगे, प्रभारी गटविकास अधिकारी पंकज शेळके, नायब तहसीलदार संदीप पाटील, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दत्त जयंती सोहळ्यानिमित्त लागणाऱ्या सुविधा, पाणी, आरोग्य, विद्युत मंडळ, एसटी महामंडळ, रस्तेवरून येताना जाताना प्रवास, पोलीस बंदोबस्त यांचे आदी प्रकारचे सुविधा पुरवल्या जातील, असेही सांगण्यात आले.
सासवड पोलीस स्टेशनकडून पाच पोलीस अधिकारी, पोलीस हवालदार बंदोबस्त ,एक नियंत्रण कक्ष, क्रेनची सोय केली जाईल, 18 ठिकाणी चेक पॉइंट केले जातील, मंदिरात देखील बंदोबस्त दिला जाणार आहे, तर जड वाहनांना पूर्णपणे बंदी ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस स्टेशनने सांगितले.