पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात रेल्वे आणि बँकेसारख्या क्षेत्रांना प्राधान्य दिलं जातं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. त्यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे, मुंबई विभागात अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. कंत्राटी वैद्यकीय व्यवसायी (गद्य) या पदांवर ही भरती केली जात आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 95 हजारांपर्यंत पगार मिळू शकतो.
सदर मुलाखत ही 11 डिसेंबर 2024 रोजी DPO कार्यालय, मध्य रेल्वे, कार्मिक शाखा, विभागीय Rly व्यवस्थापक कार्यालय, दुसरा मजला, ॲनेक्स बिल्डिंग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई -400 001 येथे घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://cr.indianrailways.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.