चांगली स्मरणशक्ती आपल्याला चांगली व्यक्ती बनवण्यास मदत करते. पण काहींना सारखं विसरायला होतं. मात्र, काही गोष्टी अशा आहेत त्याने स्मरणशक्ती वाढवता येऊ शकते. त्यात तुमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी चांगल्या खाण्याच्या सवयी आणि पुरेशी झोप महत्त्वाची असते.
पुरेशा झोपेसह आहारात साखरेचा समावेश करावा. काही क्रियाकलापांचे पालन करून, आपण आपल्या मेंदूला अधिक चांगले कार्य करण्यास प्रशिक्षित करू शकतो. एखाद्या स्थितीत व्यक्ती कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्याला ‘ब्रेन फॉग’ असेही म्हणतात. या स्थितीत मनावर थकवा आणि सुस्ती येते. कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करण्यात आणि विचार आणि समजून घेण्यात अडचण येते. त्यामुळे नियमित वाचन आणि नोट्स बनवणे चालू करा.
व्हिडिओ पाहताना टायपिंगद्वारे नोट्स बनवल्याने मेंदू अधिक सक्रिय होतो आणि गोष्टी लक्षात ठेवणे सोपे होते. अशा परिस्थितीत तुम्ही वाचताना नोट्सही बनवू शकता. माइंडफुलनेस आणि मेडिटेशनचे मेंदूसाठी अनेक फायदे आहेत. ध्यान केल्याने मानसिक ताण कमी होतो. तसेच श्वासोच्छवासामुळे मानसिक क्षमता आणि स्मरणशक्ती सुधारू शकते.