मुंबई : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव, चिन्ह संबंधित प्रकरणात नवी तारीख देण्यात आली असून शिवसेना चिन्ह आणि नावाविषयी सुनावणी ६ डिसेंबर रोजी होणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त झाल्यामुळे शिवसेना सुनावणीसाठी नवे खंडपीठ द्यावे लागणार आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर सुनावणी कधी होणार, याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी सुनावणी होणार होती, मात्र त्यावर न्यायालयाचा काहीही निर्णय न आल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. ही सुनावणी आता शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आल्याची माहिती आहे.