पुणे : सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालय, मळणगाव येथे आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, काही रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे पाचवीसह दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
मळणगाव ग्रामपंचायत कार्यालय, सांगली येथे पाणी पुरवठा कर्मचारी वर्ग, हंगामी स्वच्छता कर्मचारी आणि हंगामी संगणक ऑपरेटर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सांगली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://sangli.nic.in/या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : पाणी पुरवठा कर्मचारी वर्ग, हंगामी स्वच्छता कर्मचारी आणि हंगामी संगणक ऑपरेटर.
– नोकरीचे ठिकाण : मळणगाव, सांगली.
– शैक्षणिक पात्रता : पाचवी उत्तीर्ण, दहावी उत्तीर्ण, एमएस-सीआयटी.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 04 डिसेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : ग्रामपंचायत कार्यालय, मळणगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली.