आंबेगाव : चास ठाकरवाडी (ता. आंबेगांव) येथे बेकायदा दारू विकणाऱ्या एकावर घोडेगाव पोलीस ठाण्यात रविवारी (ता.४) संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश दादाभाऊ सैद (रा.चास ठाकरवाडी ता.आंबेगाव जि.पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याच्याकडून १३ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. याप्रकरणी सरकारच्या वतीने गणेश दादाभाऊ सैद (रा.चास ठाकरवाडी ता.आंबेगाव जि.पुणे) यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद सिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश सैद हा चास ठाकरवाडी परिसरात एका बाभळीच्या झाडाखाली दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी बेकायदा दारू विकताना आढळून आला. आरोपीला पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपीने तातडीने पळून गेला. सदर ठिकाणाहून १३ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे.
दरम्यान, आरोपी गणेश सैद याच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार तुरे करीत आहेत.