-सागर जगदाळे
भिगवण : मक्याचे पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात लोंखडी दांडा असलेले खोरे घालून युवकाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावात घडली आहे. याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात सुंदर तुकाराम ढवळे (रा. मदनवाडी ता. इंदापुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात फिर्यादी महेश सुधीर कोकरे (वय 24 वर्ष, रा. मदनवाडी ता. इंदापुर जि. पुणे) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील महेश कोकरे आणि सुंदर ढवळे यांच्यात मक्याचे देणे असलेले तीन हजार रुपयांच्या व्यवहारावरून सोमवारी (दि.02 डिसेंबर) रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास मदनवाडी गावच्या हद्दीतील जमीन गट नं 569 मध्ये या दोघांमध्ये वाद झाले. फिर्यादी महेश कोकरेजवळ असेलेले मक्यचे पैसे तीन हजार रुपये दिले नाहीत. या कारणावरुन सुंदर ढवळे याने चिडुन जाऊन कोकरे याच्या डोक्यात लोंखडी दांडा असलेले खोरे मारुन फिर्यादीला जखमी केले. शिवाय कोकरे याच्या शेतातील पाईप लाईनचा वॉल तोडुन नुकसान ही केले. या सगळ्यात कोकरे हा जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी गुन्ह्याचा तपास सहा.पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक पाटील करीत आहेत