-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुर येथे एस टी बस मधून अंध व्यक्तीस उतरण्यास उशीर झाल्याने एस टी बस चालक आणि वाहकाला अंधव्यक्तीचा राग आला. त्यावेळी बस चालक आणि वाहकाने त्यांच्या अंधत्वावर बोलून शिवीगाळ, दमदाटी करत त्याला हाताने मारहाण केले. याप्रकरणी एस टी वाहक व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अंधव्यक्ती कौशल घोडके (वय 23 रा. भांबर्डे रोड, रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील पुणे नगर महामार्गावरुन कौशल घोडके हे एम एच 20 बी एल 3420 या एस टी मधून प्रवास करत असताना एस टी थांब्यावर ते अंध असल्याने लवकर खाली उतरले नाही. त्यामुळे एस टी वाहक व चालक यांनी त्यांच्या अंधत्वावर बोलून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली. याबाबत कौशल घोडके यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी एम एच 20 बी एल 3420 या एसटीचे चालक व वाहक (नाव पत्ता माहित नाही) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार वैभव मोरे हे करत आहे.