-संतोष पवार
पळसदेव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर येथे आयोजित केलेल्या शालेय विभागीय सायकलिंग स्पर्धेत पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाच्या सायकलपटुंनी चमकदार कामगिरी करत यश मिळवले.
अहमदनगर येथे (दि. 26 नोव्हेंबर) रोजी संपन्न झालेल्या विभागीय शालेय सायकलींग स्पर्धेत पळसनाथ विद्यालयाच्या हरिश दीपक डोंबाळे या खेळाडूने 19 वर्षीय वयोगटातुन प्रथम क्रमांक मिळवला. त्याची शालेय राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेसाठी आणि खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच शालेय विभागीय सायकलिंग स्पर्धेत 17 वर्ष वयोगटात विद्यालयाच्या ओंकार जोतिराम गांधले या खेळाडुने प्रथम क्रमांक मिळविला. त्याची राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच स्वामी विवेकानंद प्रशाला व ज्युनिअर कॉलेज जुळे सोलापूर येथे संपन्न झालेल्या पुणे विभागीय शालेय मुलींच्या खो-खो स्पर्धेतून पळसनाथ विद्यालयाच्या धनश्री करे या खेळाडुची 19 वर्षीय वयोगटातून धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खोखो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व यशस्वी खेळाडू आणि मार्गदर्शक क्रीडाशिक्षक सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे, सुवर्णा नायकवाडी, रामचंद्र वाघमोडे यांचे श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगीराज काळे, सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव यांनी अभिनंदन केले आहे.