मुंबई : राज्यात अपघातांचे सत्र सुरूच आहेत. अशातच मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोडवरुन बीएमडब्ल्यू कार चालवणा-या चालकाला अचानक फिट आल्यामुळे मोठा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. ही घटना रविवारी सायंकाळी डीएन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसिक नगर बस स्टॉपवर घडली आहे. या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोडवरुन रविवारी सायंकाळी बीएमडब्ल्यू कार चालवणा-या चालकाला अचानक फिट आल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. या कारने दुचाकीसह दोन रिक्षांना जोरदार धडक दिली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच डीएन नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि अपघातात जखमी झालेल्यांना आणि फिट आलेल्या बीएमडब्ल्यू कार चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.