-योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील माजी उपसरपंच दत्ता गिलबिले यांच्यावर अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने दिवसाढवळ्या हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शिक्रापूर परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या हल्ल्यात त्यांच्या मानेवर वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्रापूर येथील माजी उपसरपंच यांच्या घराजवळच एक अंदाजे 35 वर्षाच्या इसमाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे बोलले जात आहे. गंभीर जखमी झालेले माजी उपसरपंच यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी या परिसरात बंदोबस्त लावला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तर आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवले आहे.