पुणे : चांगली नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही असाल तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, सांगली जिल्ह्यातील पलूस येथील कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी, (पलूस) सांगली येथे शारीरिक शिक्षण शिक्षक / ड्रिल शिक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कुंडल, जि. सांगली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 13 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : शारीरिक शिक्षण शिक्षक / ड्रिल शिक्षक.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : कुंडल, जि. सांगली.
– शैक्षणिक पात्रता : शारीरिक पदवी / पदव्युत्तर किंवा ड्रिल इन्स्ट्रक्टर कोर्स किंवा पी.टी. मास्टर कोर्स.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 20,000/-.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन .
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 02 डिसेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2024 .
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : महासंचालक, कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वन) कुंडल, क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या पुढे, कुंडल विटा रोड, पलूस, जिल्हा सांगली, पिन 416309.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.kundalforestacademy.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.