शिक्रापूर : पाबळ येथे पत्त्यांच्या साहाय्याने जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत जुगार खेळणाऱ्या संजय प्रभाकर रत्नपारखी, सोपान विठोबा जाधव, अजय खबाजी पानसरे व भाऊसाहेब तात्याबा दौंडकर या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पाबळ येथे एका झाडाच्या आडोशाला काही इसम पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली.
त्यांनतर पोलिसांनी छापा टाकत जुगाराच्या साहित्यांसह रोख रक्कम जप्त केली. याबाबत पोलीस हवालदार विशाल तानाजी देशमुख (रा. शिक्रापूर ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी संजय प्रभाकर रत्नपारखी (वय ५४), सोपान विठोबा जाधव (वय ५९), अजय खबाजी पानसरे (वय ४२, तिघे रा. पाबळ ता. शिरुर), भाऊसाहेब तात्याबा दौंडकर (वय ४९ रा. कन्हेरसर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.