पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबईतील कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), अप्पर डिव्हिजन क्लर्क (यूडीसी), स्टेनोग्राफर (स्टेनो), असिस्टंट/हेड- क्लर्क, एसएसओ, पर्सनल असिस्टंट (पीए) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पंचदीप भवन, 108, एन.एम. जोशी मार्ग. लोअर परळ, मुंबई-400 013 येथे सदर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), अप्पर डिव्हिजन क्लर्क (यूडीसी), स्टेनोग्राफर (स्टेनो), असिस्टंट/हेड- क्लर्क, एसएसओ, पर्सनल असिस्टंट (पीए).
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याचे माध्यम : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 डिसेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पंचदीप भवन, 108, एन.एम. जोशी मार्ग. लोअर परळ, मुंबई-400 013.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.