मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलीवर टॅक्सी चालकाने प्रवासादरम्यान केले लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ माजली आहे. तरुणी कॉलेजला जात असताना टॅक्सी चालकाने तरुणीवर हात टाकला. नराधम टॅक्सी चालक जगन्नाथ काळे, ४७ याला काळाचौकी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तरुणीवर कोणी जादूटोणा केल्याचा बनाव करत तिला पुढील सीटवर बसायला भाग पाडलं नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षणा (पॉक्सो) कायद्यांतर्गत टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ माजली आले. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहे.
राज्यात महिलांवर होणारे अत्याचार मुख्य मुद्दा बनत आहेत. यामध्ये सतत वाढ होत असून महिलांनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी बदलापूर येथील घटनेने महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली होती. आता पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं.