मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या घरावर ईडीने छापेमारी केल्याचं वृत्त समोर येत आहे. जुहू येथील घरावर ईडीने छापा टाकला आहे.
मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पॉर्नोग्राफी कंटेन्टची निर्मिती आणि वितरणाच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्रा याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. ही धाड शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूझ येथे असलेल्या घरी अधिकाऱ्यांनी सकाळी 6 वाजता पडली आहे.
पॉर्नोग्राफीच्या शॉर्ट व्हिडिओ बनवून ते विविध माध्यमांतून प्रसारित केल्याचा ठपका राज कुंद्रावर ठेवण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीने त्याच्या घरी धाड टाकली आहे. यापूर्वी पॉर्नोग्राफी केस प्रकरणात राज कुंद्राला अटक झाली होती.