लोणी काळभोर : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रतिवर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. त्यात यंदा विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय पक्षांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांच्या माध्यमातून होणारे रक्तसंकलनाचे काम थंडावले आहे. त्यामुळे रक्ताची गरज ओळखून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील द टायग्रिष स्कूल या इंग्रजी माध्यमाचे शाळेने शनिवारी व रविवारी (ता. 23 ते 24) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला २२ रक्त दात्यांनी रक्तदान करून उस्फुर्त सहभाग नोंदविला आहे.
रक्तदान शिबिरात २२ पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात आले. रक्तसंकलन हे रक्तपेढी मध्ये पाठवण्यात आले आहे. ज्याचा फायदा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या तुटवड्यामुळे शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व प्रकारच्या रुग्णांना होणार आहे. राज्य सरकार आणि रक्त पेढी यांच्या सामाजिक आवाहनाला प्रतिसाद देत द टायग्रिष स्कूलने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यासाठी विश्वराज हॉस्पिटलचे डॉ.निलेश पाटील, पी.आर.ओ. विकास कांबळे, टेक्निशियन अफीफा शेख, अभिषेक कडू, साक्षी कुंजीर, सिद्धू जावळे, दीपक खाडे, रोहित थोरात, संगीता सोळंकी यांनी काम पहिले. द टायग्रिष स्कुलकडून पूनम सावंत, मोनाली जयकर, ज्ञानेश्वर ताते, सुयश सुरवसे, नैना घंटे, वैशाली काळे, रोहिणी कुलकर्णी, शोभा लोणकर, विद्या जगताप यांचे बहुमुल्य मदत मिळाली. तर शाळेतील नववी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाचे कामकाज पाहिले.