कर्जत : कर्जत येथील एका फार्म हाऊसवर छापा मारून ५० हजार रुपये किमतीचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. सावेळे गावच्या हद्दीतील एका फार्म हाऊसमध्ये दोन व्यक्तींनी अवैध विदेशी मद्यसाठा ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्याआधारे छापा मारला असता दोन व्यक्ती, विदेशी मद्य, तंबाखूयुक्त हुक्का फ्लेव्हर व हुक्का ओढण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा साठा आढळला. त्यावर पोलिसांनी विदेशी मद्यसाठा व साठवणूक केलेल्या इतर पदार्थांच्या परवान्याबाबत या दोघांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.