IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु असून या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथ पार पडला असून भारताने दणदणीत विजय मिळवला आहे.भारताने 295 धावांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत करत पर्थ कसोटीत इतिहास रचला आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. एडिलेडध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डे नाईट सामना होणार आहे. परंतु, भारताचा स्टार खेळाडू दुसऱ्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसऱ्या सामन्यात शुबमन खेळेल की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान गिलच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. फ्रॅक्चर नसला तरी अजूनही फीट नसल्याचं सांगितलं जात आहे. गिलला बरं होण्यासाठी अजून काही वेळ लागणार आहे.
शुबमन गिलं हा टीम इंडियासोबत कॅनबरा येथे पोहोचला आहे. पण दोन दिवसीय पिंक बॉल सराव सामन्यात खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे. एका रिपोर्टनुसार, शुबमन गिलला आणखी काही दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे एडिलेड येथे डे नाईट कसोटी सामना खेळण्याबाबत शंका आहे. जर त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात स्थान मिळालं नाही आणि भारताने दुसरा सामना कसोटी सामना जिंकला तर गिलला संधी मिळणं कठीण आहे. कारण पहिल्या कसोटीमध्ये शुबमन गिल खेळला नव्हता. त्यात देवदत्त पडिक्कलची कामगिरी साजेशी नव्हती. त्यामुळे तीच जागा शिल्लक होती. आता त्या जागेवर रोहित शर्मा खेळणार हे आता स्पष्ट झालं आहे.
रोहित शर्मा कौटुंबिक कारणास्तव पहिल्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. मात्र तो दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. त्यामुळे कर्णधार असल्याने प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये देवदत्त पडिक्कलला स्थान मिळणं कठीण आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात एडिलेडमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.