सध्या हिवाळा सुरू झाला आहे. या थंडीच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचं बनतं. तसेच या हिवाळ्याच्या दिवसात आपण काय घालावं? काय नको, याच्या विचारात सातत्याने असतो. पण जेव्हा फूटवेअरचा विषय येतो तेव्हा मात्र काही गोष्टींकडे लक्ष दिलं जातं.
हिवाळ्यात विविध प्रकारचे कपडे, जॅकेट, कोट वापरण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. अशा परिस्थितीत ट्रेंडी आणि स्टायलिश दिसण्यासाठी विशेषतः मुलींनी फॅशन आणि कम्फर्टनुसार फूटवेअर निवडले पाहिजेत. जेणेकरून ते थंडीपासून बचाव करू शकतील आणि स्टायलिशही दिसू शकतील. हिवाळ्यासाठी बूट हा एक चांगला पर्याय आहे. हे पायांना थंडीपासून वाचवतातच, पण स्टायलिशही दिसतात.
तुमच्या पायांसाठी एक लाँग बूट वापरून पाहा. हे तुमचे पाय पूर्णपणे झाकतात आणि थंड वाऱ्यापासून त्यांचे संरक्षण करतात. तुम्ही ते जीन्स किंवा लेगिंग्जसोबतही घालू शकता. एंकल बूट्सही एक चांगला पर्याय आहे. हे बूट्स लहान आणि ट्रेंडी असतात. जे बहुतेक कॅज्युअल आणि स्मार्ट कॅज्युअल या कपड्यांवर चांगले दिसून येतात. तसेच जर तुम्हाला स्टाईल आणि थंडीपासून वाचायचं असेल तर ओवर-द-नी बूट्स एक उत्तम पर्याय आहेत. हे कपडे किंवा स्कर्टसह चांगले दिसतात.