Skin Care in Winter : राज्यात थंडीला सुरुवात झाली आहे. अशावेळी आपल्या त्वचेची काळजी घेणेही खूप महत्त्वाचे असते. हिवाळा आला की त्वचा काळी पडू लागते. थंडीमध्ये त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होतं आणि त्वचा कोरडी होते. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा. यामुळे या दिवसात तुमची त्वचा कोमल आणि मुलायम राहील.
अशी घ्या त्वचेची काळजी…
-रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने धुवा. चेहरा धुताना फेसवॉशचा वापर करा. चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्याने त्वचा कोरडी पडते.
-आंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रिमऐवजी करावा.
-त्वचा हायड्रेट करण्यासाठी इसेन्शिअल ऑईल नेहमीच मदत करतात. लव्हेंडर ऑईल, खोबरेल तेल, प्राईमरोज ऑईल सारख्या इसेन्शिअल ऑईलचा वापर करा.
-ज्यांना चेहऱ्यावर पुरळ आहेत, अशा व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फेशिअल ऑईलचा वापर करणे फायदेशीर ठरेल.
-हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे.
-पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो.
-थंडीत कोरड्या चेहऱ्यावर थोड्या प्रमाणात गुलाबजल स्प्रे करा. हलक्या हातांनी पसरवा. आणि ते कोरडे होऊ द्या. अशाने चेहरा मऊ होईल आणि चमकदारही राहील.