भोर : वीसगाव खोऱ्यातील नेरे (ता. भोर) येथील शेतकरी शंकर रामचंद्र शिंदे डोंगर परिसरातून सायंकाळी जनावरे घरी घेऊन येत होते. त्यावेळी रस्त्याच्या शेजारी प्लास्टिकच्या पिशवीवर म्हशीचा पाय पडल्याने मोठा स्फोट होऊन शिंदे यांची म्हैस जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि. २५) घडली.
शिंदे नेहमीप्रमाणे डोंगर परिसरातील माळरानावर शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक म्हैस व शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले होते. रानात चारून सायंकाळच्या वेळी जनावरे घरी घेऊन येताना रस्त्याशेजारीच प्लास्टिक पिशवीत असलेल्या हातबॉम्बवर पुढे चाललेल्या म्हशीचा पाय पडला. यावेळी मोठा स्फोट झाला. त्यामध्ये म्हैस जखमी झाली. जखमी म्हशीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू करण्यात आले आहेत.