मुंबई : गेल्या लोकसभेत नामुष्की ओढवलेल्या महायुतीने राज्यात विधानसभा निवडणुकीत मात्र जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला अक्षरशः लोळवले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. याबाबत राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळणार हेही जवळपास निश्चित झाले आहे.
अशातच, एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव फॉर्म्युला दिला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊ इच्छित नाही. मी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार आहे, असा निरोप एकनाथ शिंदेंनी भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोहचवला असल्याचा दावा करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपला नवा प्रस्ताव फॉर्म्युला दिला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव भाजपला मान्य नसल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहावे अशी भाजपची इच्छा आहे. याबाबत एकनाथ शिंदे आणि भाजप हायकमांडची चर्चा देखील सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला. त्यानंतर राज्यात नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.